आम्ही लॉकडाऊन पीडित
मी सोनाली. एक सर्व सामन्य मुलगी. मराठी माध्यमात शिकलेली. खूप लहान वयात वाचनाची आवड जडली. पुस्तकं वाचणे, वृतपत्राचा आढावा घेणे, त्यावर सखोल चर्चा करणे, मग त्यावर आपल्याला नक्की काय वाटतं आहे आपलं नक्की काय मत आहे हे लिहायला लागले. हीच आवड वय आणि वेळेसोबत वाढतच गेली. वाचन हे विचारांना धार देत गेलं. स्वतःची स्वतंत्र्य मतं तयार होत गेली. मग ती व्यक्त करण्याची धडपड सुरु झाली. आपली मत मांडायची म्हटल तर ती अशीच कुठे ही मांडता येत नसतात हे खूप कमी वयात लक्षात आलं. त्यासाठी एक योग्य व्यासपीठ हवं हे ही समजलं. मग शाळेत असतानाच आपण एक लेखिका, कवयत्री, वक्ता, रेडिओ जॉकी, किंवा उत्तम वृत निवेदिका व्हावं असं वाटू लागलं. शाळेत असताना वर्गात कुणी विचारलं की मोठं झाल्यावर तुला काय व्हायचं आहे ? तर सर्वाची नेहमीची उत्तर ठरलेली असायची. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, किंवा अंतराळवीर... मी मात्र दिमाखात सांगणार उत्तम लेखिका किंवा पत्रकार... काही तरी वेगळं उत्तर आलं की शिक्षकांना कौतुक वाटायचं. मलाला, सुहास शिरवळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फूले, ताराबाई शिंदे, बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम म